Marathi Wishes ही मराठी शुभेच्छा, संदेश आणि स्टेटससाठीची वेबसाइट आहे. वाढदिवस, सण, लग्न, घरगुती कार्यक्रम किंवा रोजचा सुप्रभात मेसेज, प्रत्येक प्रसंगासाठी योग्य मराठी शब्द एका ठिकाणी मिळावेत, हा आमचा उद्देश आहे.
इथे काय मिळेल
प्रत्येक पान एका नात्यासाठी किंवा एका प्रसंगासाठी लिहिलेलं आहे: कुटुंबासाठी वाढदिवस शुभेच्छा, नातेवाईकांसाठी वाढदिवस शुभेच्छा, वाढदिवस शुभेच्छा, कविता व स्टेटस, सण-उत्सवाच्या शुभेच्छा, भक्तिमय शुभेच्छा, महापुरुषांच्या जयंती शुभेच्छा, राष्ट्रीय व खास दिवसांच्या शुभेच्छा, लग्न व लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, घरगुती कार्यक्रमांच्या शुभेच्छा आणि इतर शुभेच्छा व संदेश.
प्रत्येक शुभेच्छा वेगळ्या बॉक्समध्ये आहे. Copy बटण दाबलं की पूर्ण मजकूर इमोजीसकट कॉपी होतो आणि Share बटणाने तो थेट WhatsApp किंवा मोबाईलच्या शेअर मेनूमध्ये जातो.
आम्ही शुभेच्छा कशा लिहितो
सगळ्या शुभेच्छा मराठी बोलणाऱ्या आमच्या टीमने लिहिलेल्या आणि तपासलेल्या आहेत. प्रत्येक पान प्रकाशित करण्यापूर्वी शुभेच्छा त्या नात्याला आणि प्रसंगाला शोभतात का, शब्द आणि माहिती बरोबर आहे का, हे आम्ही वाचून पाहतो.
प्रत्येक पानाच्या शीर्षकातला आकडा त्या पानावरील शुभेच्छांची खरी संख्या आहे. नवीन शुभेच्छा जोडल्या की आम्ही तो आकडा बदलतो.
संपर्क
एखाद्या नात्यासाठी किंवा सणासाठी शुभेच्छा हव्या असतील, मराठीत चूक दिसली किंवा तुमची स्वतःची शुभेच्छा पाठवायची असेल तर asharrprivate@gmail.com वर ईमेल करा किंवा Contact Us पान पाहा.